टिप्परच्या धडकेत अकोल्यातील तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी:पारखेड फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीला दिली धडक, चालक पसार
खामगाव-नांदुरा महामार्गावरील पारखेड फाट्याजवळ गुरुवारी (दि. २३) रात्री ९ वाजेच्या सुमारास टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला येथील २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे अन्य दोन मित्र जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील तीन मित्र दुचाकीने भुसावळ येथे आपल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. दरम्यान, पारखेड फाट्याजवळ खदान रस्त्यावरून अचानक महामार्गावर…