Headlines

मामाच्या घरी भेटीला गेलेल्या अंगणवाडी सेविकेचा ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू:गंगापूर-वैजापूर मार्गावर घडला अपघात

गंगापूर-वैजापूर मार्गावरील मुद्देशवाडगाव पाटी येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटीवरील एका अंगणवाडी सेविकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंजली कैलास तुपलोंढे (२६, रा. जामगाव, ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, अंजली तुपलोंढे या वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे आपल्या मामाच्या घरी भेटीसाठी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली….

Read Full News

एसटीच्या दीडपट भाड्याची परवानगी:जास्त घेतल्यावर ट्रॅव्हल्सवर कारवाई

महामंडळाच्या तिकीट दराच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सला दीडपट भाडे आकारण्याची मुभा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आगाऊ तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांची गर्दी वाढताच काही ट्रॅव्हल्सनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. पुण्याचे तिकीट ६०० रुपयांवरून १,८९०, तर मुंबईचे तिकीट ८०० रुपयांवरून ३ हजारांपर्यंत आकारले जात होते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने जादा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. Source link

Read Full News

वैजापूरमध्ये 4 दुकानांचे शटर उचकटून चोरीचा केला प्रयत्न:पोलिस गस्त वाढवण्याची मागणी: 17 हजार लंपास

शहरात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत चोरट्याने धुमाकूळ घातला. मुरारी पार्क परिसरातील चार दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी एका मोबाईल दुकानातून सहा ते सात हजार, तर लाडगाव रोडवरील किराणा दुकानातून दहा हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. शहरातील अन्य सहा ते सात ठिकाणीही चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाच रात्री अनेक…

Read Full News

गुन्हेगार, अतिरेक्यांची नवी शस्त्रे बनले ड्रोन:तुरुंगांत ड्रग्जचा पुरवठा, लष्करी तळांची हेरगिरी; दक्षिण आशियाच्या 7 देशांत नेटवर्क

दक्षिण-पूर्व आशियात स्वस्त ड्रोन गुन्हेगार आणि दहशतवादी संघटनांची नवी शस्त्रे बनले आहेत. यांचा वापर अमली पदार्थांची तस्करी, तुरुंगांमध्ये प्रतिबंधित वस्तू पोहोचवणे, लष्करी तळांची हेरगिरी आणि अटकेपासून बचाव करण्यासाठी पोलिसांवर नजर ठेवणे यासाठी केला जात आहे. अहवालानुसार, या प्रदेशातील सात देशांमध्ये ड्रोनशी संबंधित बेकायदेशीर कारवाया समोर आल्या आहेत. ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ८६ टक्के प्रकरणे…

Read Full News

देवगाव रंगारी ठाण्याच्या हद्दीत दारूविक्री; तीन ठिकाणी छापे:दारूच्या 47 बाटल्या जप्त; तीन जणांवर गुन्हे दाखल

देवगाव रंगारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूविक्रीविरोधात गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाया केल्या. या कारवायांमध्ये ५ हजार ३२० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या ४७ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी ६ वाजता ताडपिंपळगाव येथे छापा टाकून निलेश कैलास…

Read Full News

अनोखी मिरवणूक:पिशोरमध्ये नव्या गुळाची मिरवणूक

येथील प्रसिद्ध गावरान गुळाच्या नवीन हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी अत्यंत उत्साहात झाला. स्थानिक व्यापाऱ्याने गुऱ्हाळातून खरेदी केलेला नवीन गूळ रथात ठेवून, आतषबाजी, हलगीचा कडकडाट आणि डफड्याच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढली. ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारात आणि जयघोषात हा गूळ विक्रीसाठी दुकानात आणण्यात आला. ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पिशोरचा गूळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यात…

Read Full News

पर्यटन विकासाची संधी:पैठण शहरात पालथीनगरीच्या वैभव जतनाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

संतांची भूमी, प्राचीन प्रतिष्ठान नगरी आणि ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या पैठण शहरातील जुन्या भागातील पालथीनगरीकडे विकासाच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. इतिहासाच्या अनमोल खुणा जपणाऱ्या या परिसराला नियोजनबद्ध विकासाची जोड मिळाल्यास ऐतिहासिक वारसा संवर्धनासोबतच पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, केवळ केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभागाच्या उदासीन धोरणामुळे या…

Read Full News

Most Wanted Gangster Himanshu Bhau Arrested By FBI In USA

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊला अमेरिकेत एफबीआयने अटक केली आहे. हिमांशूविरोधात दिल्ली, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्रांची तस्करी यांसारखे ३० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. माध्यमांमधील वृत्तांनुसार ही माहिती समोर आली आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात २०२३ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. हरियाणा पोलिसांनी…

Read Full News

चापानेर परिसरात दुष्काळाचे संकट; रब्बीचा हंगाम धोक्यात:जमिनीत ओलावा नसल्याने पेरणीची आशा मावळली

दरवर्षी निसर्गाच्या कृपेने आणि चांगल्या पावसाच्या जोरावर खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके भरघोस घेणारा चापानेर परिसरातील शेतकरी राजा यंदा मात्र संकटात सापडला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील मक्का, सोयाबीन आणि कपाशी यांसारख्या प्रमुख पिकांना अपुऱ्या पावसाचा जबर फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजा…

Read Full News

सोनाप्पावाडीत चारा साक्षरता, संवर्धन अभियान; पशुपालकांसाठी मार्गदर्शन:दुष्काळी स्थितीत पशुधन टिकवण्यासाठी पौष्टिक चारा व्यवस्थापनावर भर

सिल्लोड तालुक्यातील सोनाप्पावाडी येथे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण, संवर्धन आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी चारा साक्षरता व संवर्धन अभियान उत्साहात पार पडले. पशुवैद्यकीय चिकित्सालय, बोरगाव बाजार यांच्या वतीने गुरुवारी आयोजित या अभियानात पशुपालक शेतकऱ्यांना पौष्टिक चारा व्यवस्थापन आणि पशुधन विमा योजनेचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे…

Read Full News