Headlines

यूपीच्या लखनऊत रस्त्यांवर चालत आहेत बोटी:बिहारमध्ये 8 लाख लोकसंख्येला पुराचा वेढा, एमपीत 3 दिवसांनंतर बदलेल हवामान

उत्तर प्रदेशात 9 दिवसांपासून पाऊस झाला नाही, मात्र पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये 10 नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत. लखनऊमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढल्याने 40 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बिहारमध्ये पुरामुळे परिस्थिती अत्यंत खराब आहे. गंडक नदीला आलेला पूर आणि तटबंदी तुटल्यामुळे…

Read Full News

ऑनलाइन कंपन्या, मॉल संस्कृती अन् करांच्या कचाट्यावर परिषदेतून मंथन:ऑनलाइन कंपन्या, मॉल संस्कृती अन्‎करांच्या कचाट्यावर परिषदेतून मंथन‎

एका बाजूला ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन कंपन्यांची आक्रमक स्पर्धा, दुसरीकडे मॉल संस्कृतीचा वाढता विस्तार आणि त्यात जीएसटीसह विविध करांचे किचकट गणित… या तिहेरी कचाट्यात छोट्या व्यापाऱ्याने बाजारात टिकायचे कसे, हा प्रश्न रविवारी वैजापुर येथे भरलेल्या मराठवाडा व्यापारी परिषदेच्या केंद्रस्थानी राहिला. यूपीआयवरील एमडीआरपासून करप्रणालीतील अडचणींपर्यंत प्रश्नांचा पाढा वाचत व्यावसायिकांनी एकजुटीची गरज अधोरेखित केली. बदलत्या बाजाराशी दोन हात करण्यासाठी…

Read Full News

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या:सटाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन‎

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या रेबीज प्रतिबंधात्मक उपचारांचा खर्च नगरपालिकेने उचलावा, तसेच जखमींना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस . यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील व नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांना निवेदन देण्यात आले. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, लहान मुले, महिला,…

Read Full News

लासलगाव रेल्वे स्थानकावर ‘वायर रोप’चा फास:दुचाकी लावल्यास 500 रुपये दंड, प्रवाशांना सोडवण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर आरपीएफची दंडात्मक कारवाई‎

येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडविण्यासाठी तसेच तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या दुचाकींना आरपीएफ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वायर रोप लावून ५०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज होणाऱ्या या कारवाईमुळे रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी वैतागले असून ही कारवाई थांबवण्याची मागणी होत आहे. रेल्वे स्थानकावर जवळपास १० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या थांबतात. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास…

Read Full News

SC मध्ये आज CEC ज्ञानेश कुमार विरोधात सुनावणी:एकतर्फी निर्णय घेण्याचा आरोप; मागणी- निर्णय येईपर्यंत कामकाजापासून दूर ठेवा

सर्वोच्च न्यायालय 5 ऑक्टोबर रोजी CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन याचिकांवर सुनावणी करणार आहे. या याचिका स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) शी संबंधित निर्णयांबाबत दाखल करण्यात आल्या आहेत. आरोप आहे की, SIR शी संबंधित 14 निर्णय इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या संमतीशिवाय घेण्यात आले. याचिकाकर्त्यांनी हे निर्णय रद्द करण्याची, ज्ञानेश कुमार यांच्यावर खटला चालवण्याची…

Read Full News

आखतवाडेच्या रेशनप्रश्नी सरपंच परिषद मैदानात:आज तहसील कार्यालयावर धडक‎, निर्णय न घेतल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा‎

गावकऱ्यांनी पुरावे देऊन रद्द केलेला रेशन दुकानदाराचा परवाना पुन्हा सुरू झाल्याने आखतवाडे येथे साखळी उपोषण सुरू असून, या आंदोलनाला बागलाण तालुका सरपंच परिषद व सरपंच संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, या मागणीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. एका व्यक्तीच्या गैरप्रकाराचा फटका संपूर्ण गावाला बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला…

Read Full News

कळवणमध्ये 14.19 कोटींतून कृषी भवनाची उभारणी‎:प्रशासकीय, तांत्रिक मान्यता; कृषी मार्गदर्शनासोबत दर्जेदार रोपे व सेवा एकाच ठिकाणी मिळणार‎

. तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध सेवा व योजनांसाठी स्वतंत्र कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासू नये, यासाठी अत्याधुनिक आणि सर्वसुविधायुक्त कृषी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व अधिनस्त दोन मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांसाठी कृषी विभागाच्या मालकीच्या जागेवर या इमारतीचे बांधकाम होणार आहे. प्रकल्पाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली असून,…

Read Full News

नियमांचे पालन करा, आव्हानांना सामोरे जा:एफडीएचे सहआयुक्त चंद्रकांत मोरे यांचे मार्गदर्शन; फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त लासलगावी कार्यशाळा‎

बदलत्या परिस्थितीत केमिस्ट बांधवांनी अन्न व औषध क्षेत्रातील नवीन नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, व्यवसाय करताना आवश्यक काळजी घ्यावी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे मार्गदर्शन नाशिक जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रकांत मोरे यांनी केले. फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त लासलगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व निफाड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट…

Read Full News

जीवनामध्ये मिळणारे सुसंस्कार यशाच्या शिखरावर पोहोचवतात- किशोर महाराज:कन्नड शहरामधील शांतीनगर येथे श्रीमद् भागवत महापुराण कथा‎

जीवनात मिळणारे उत्तम सुसंस्कार आणि चांगल्या माणसांची संगत हीच मानवाला यशाच्या व सन्मानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवत असते. मानवाच्या जडणघडणीत त्याच्या संगतीचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात सत्संगाची कास धरावी, चांगल्या विचारांच्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांशी मैत्री करावी, असे प्रतिपादन किशोर महाराज कासोदेकर यांनी केले. शहरातील शांतीनगर, चंपावती नगर येथील नवचैतन्य हनुमान मंदिरात…

Read Full News

भरधाव सिमेंट ट्रेलरची उभ्या कारला धडक:15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू,आई-वडील जखमी, सिल्लोड तालुक्यातील पालोद फाट्यावर घडला अपघात‎

तालुक्यातील पालोद फाटा येथील एका हॉटेलसमोर रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सिमेंट ट्रेलरने उभ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेत कारमधील १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. दत्ता शामराव उघडे (१५, रा. पालोद, ता. सिल्लोड) असे मृत मुलाचे नाव आहे. दत्ता उघडे हा आपली आई अनिता उघडे व…

Read Full News