सटाण्यातील 12 प्रभागांत जंतुनाशक फवारणी:डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी नगरपरिषदेची व्यापक मोहीम
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सटाणा नगरपरिषदेने डास निर्मूलनाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी शहरातील सर्व १२ प्रभागांमध्ये एकाच वेळी ७ ट्रॅक्टर ब्लोअरच्या माध्यमातून द्रवरूप जंतुनाशक फवारणीला प्रारंभ करण्यात आला. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले….