Headlines

पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करु द्या; स्मार्ट मीटर हद्दपार करा:बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन‎

पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करू द्या, स्मार्ट मीटरला हद्दपार कर, यासह अन्य मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. अनेक फेरीवाले, पथविक्रेते रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला, फळे विकून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. मात्र त्यांच्यावर अतिक्रमण विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून रोज कारवाई करून त्यांच्या मालाची नासधूस केली…

Read More

तामिळनाडूच्या 52 मंदिरांत स्मार्टफोन नेण्यास बंदी:जमा केल्यावर ₹5 शुल्क द्यावे लागेल; कॅमेरा नसलेले मोबाईल आत नेता येतील

तमिळनाडू सरकारने राज्यातील ५२ प्रमुख मंदिरांमध्ये स्मार्टफोन घेऊन जाण्यावर आणि वापरण्यावर बंदी घातली आहे. हा नियम मंगळवारपासून लागू झाला. नवीन नियमानुसार, भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी स्मार्टफोन काउंटरवर जमा करावा लागेल. यासाठी प्रत्येक फोनवर ५ रुपये शुल्क आकारले जाईल. कॅमेरा नसलेले मोबाईल फोन मंदिरात घेऊन जाण्याची परवानगी असेल. हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डोमेंट्स (HRCE) मंत्री रमेश…

Read More

कपाशीवर समाजकंटकांची कुऱ्हाड; जऊळखेडमध्ये पिकाची नासधूस:आधी ठोकबर्डी, आता जऊळखेड बु. येथे उभ्या कपाशीचे पीक उखडले, पोलिसांत तक्रार दाखल‎

जिल्ह्यात गत ३१ दिवसांपासून पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने बळीराजा आधीच भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत चोहोट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये उभ्या कपाशीच्या पिकाची जाणीवपूर्वक नासधूस करण्याचे प्रकार समोर येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठोकबर्डी शिवारात दोन एकरातील कपाशीचे पीक कापून टाकल्याच्या घटनेनंतर, आता जऊळखेड बु….

Read More

सण गोड करण्यासाठी केंद्राचा निर्णय:व्यापाऱ्यांच्या साखर साठेबाजीला वेसण, व्यापाऱ्यांना 2000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही

सणासुदीत साखर महाग होणे महागात पडू शकते, हे लक्षात आल्यावर केंद्राने व्यापाऱ्यांच्या साखर साठेबाजीला आणखी वेसण घातली. आधी १ ते ३१ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांना ४००० क्विंटलपर्यंत साठ्याची परवानगी होती. १ सप्टेंबर रोजी नवा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार व्यापाऱ्यांना १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर कालावधीत २००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही. दरम्यान, ब्राझीलमध्ये अति पावसाने…

Read More

खेळातून मिळतात शिस्त, समर्पण, नेतृत्वासह संघ भावनेचे धडे- बछेर:बिर्ला कॉलनीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा‎

बिर्ला कॉलनीच्या परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. विदर्भ कॅरम असोसिएशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजीतसिंग बछेर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले. “खेळ केवळ शारीरिक सुदृढता देत नाही, तर…

Read More

अस्वच्छतेसह 7 त्रुटी; ब्लिंकिटचा परवाना निलंबित:खाद्यान्नाची अयोग्य साठवणूक, रेकॉर्डचा अभाव; नोटीस देऊनही त्रुटी राहिल्याने एफडीएचा दणका‎

शहरातील मूर्तिजापूर हायवे, कंवर नगर येथील ‘मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. . सहायक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी र. व्हा. सोळंके यांनी १२ ऑगस्ट रोजी या पेढीची प्रत्यक्ष तपासणी केली होती. या…

Read More

फुलंब्रीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह 13 नगरसेवकांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश:ठाकरे गटाचे 7, काँग्रेसचे 4 तर श.प. चा 1, आता विरोधी पक्षच उरला नाही

फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मंगळवारी मोठी उलथापालथ झाली. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे व काँग्रेसचे उपनगराध्यक्ष जमीर पठाण यांच्यासह १३ नगरसेवकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिंदे गटात प्रवेश के . शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे ७, काँग्रेसचे ४, तर शरद पवार गटाचा १ असे १२ नगरसेवक आणि १ स्वीकृत सदस्य…

Read More

संतप्त मराठा आंदाेलकांचा टायर पेटवून जालना, बीडला रास्ता राेकाे:उपोषणाचा चौथा दिवस, मंत्र्यांची उपसमिती आंतरवालीत पोहोचलीच नसल्याने संताप, साेलापुरात मंत्री गाेरेंचा ताफा अडवला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रात्री त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे, मराठा आरक्षण उपसमिती आंतरवालीत पोहोचली नसल्याने संताप व्यक्त होत होता. दरम्यान, सोलापुरात मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा आंदोलकांनी रोखला होता. मसुदा जरांगेंकडे- विखे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे…

Read More

एनकाउंटर स्पेशलिस्ट राममंदिराचे पहिले CEO होणार?:शरद शर्मा प्रवक्ते होणार; देणगी चोरीनंतर अयोध्येत आज ट्रस्टची तिसरी बैठक

यूपीचे एन्काउंटर स्पेशालिस्ट राहिलेले माजी आयपीएस अधिकारी राजेश पांडे यांची अयोध्या राम मंदिराचे पहिले सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत राजेश पांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रयागराजचे रहिवासी असलेल्या राजेश पांडे यांना युनायटेड नेशन्सच्या कोसोवो पीसकीपिंग मिशनमध्ये काम करण्याचा अनुभव…

Read More

इगतपुरीत लोहमार्ग पोलिसांची गाडी धक्क्यावर:भररस्त्यावर बंद पडले वाहन, साफसफाई करणाऱ्या मुलांच्या मदतीने केले सुरू‎

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात विविध कामांना वेग आला असताना, कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या इगतपुरी रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलिसांच्या वाहनाची दुरवस्था समोर आली आहे. पोलिसांची गाडीच भररस्त्यात बंद पडल्याने ती सुरू करण्यासाठी चक्क पोलिस ठाण्यात साफसफाईचे काम करणाऱ्या मुलांना धक्का देण्यासाठी बोलवावे लागल्याचा प्रकार घडला. काही मिनिटे गाडीला धक्का दिल्यानंतर वाहन सुरू झाले. मात्र, या…

Read More