Headlines

ॲड. एस. के. जैन यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान:शिक्षण संस्थांनी नैतिकतेशी तडजोड करू नये, शिक्षकांचा सन्मान महत्त्वाचा – ॲड. जैन

पुणे: ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस. के. जैन यांना पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, पुणे यांच्या वतीने स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना ॲड. जैन यांनी शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या मजबूत असले तरी नैतिकतेशी तडजोड करू नये, असे आवाहन केले. ॲड. जैन म्हणाले की, शिक्षण संस्था चालवताना पैसा कितीही…

Read More

पुणे महापालिका भरती घोटाळा:बनावट नियुक्तीपत्रांनी 45 लाखांची फसवणूक, जेजुरी देवस्थान विश्वस्तासह इतरांवर गुन्हा दाखल

पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर यांच्यासह महानगरपालिकेचे शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शलाका विनायक ढोणे…

Read More

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन:गांधी भवनमध्ये अंत्यदर्शन, सोमवारी होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी ( वय ८४)यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. डॉ. सप्तर्षी यांनी युवक क्रांती दलाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली….

Read More

पुणे परिमंडळात 1281 वीजचोरांवर कारवाई:महावितरणने 81 लाखांचा दंड ठोठावला, फौजदारी कारवाईचा इशारा

महावितरणने पुणे परिमंडळात गेल्या पंधरा दिवसांत धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई केली आहे. या कारवाईत वीजचोरांनी एकूण ३४०७३० युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना ८१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कलम १३५…

Read More

Parcel Label Data Theft Scam Alert; Cyber Fraudsters Target Personal Info

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तुम्ही नुकताच उघडलेला पार्सलचा डबा कचऱ्यात फेकून दिला. पण काय माहीत, तो डबा तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनू शकेल. हे नक्कीच विचित्र आहे, पण सायबर तज्ञांच्या मते, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या पार्सलवर चिकटवलेले ते छोटे स्टिकर, ज्याकडे आपण कधी लक्षही देत नाही, ते फसवणूक करणाऱ्यांसाठी सोन्याची खाण बनले आहे. जरा विचार…

Read More

सायबर चोरट्यांकडून सव्वादोन कोटींची फसवणूक:पुण्यात वेगवेगळ्या घटनेत नागरिकांना लक्ष्य

पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांची एकूण २ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष आणि ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार प्रामुख्याने घडले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी अनेक नागरिकांना लक्ष्य केले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील एका…

Read More

दस्तनोंदणीस नकार दिल्याने सहदुय्यम निबंधकाला मारहाण:आंबेगाव कार्यालयात घडला प्रकार, वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा

आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दस्तनोंदणीस नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र कोळी यांनी या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कोळी हे वरिष्ठ लिपिक असून, गेल्या महिन्याभरापासून ते आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी…

Read More

How to Fill SIR Form Online 2026

सध्या महाराष्ट्रासह देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल परीक्षण, म्हणजेच ‘एसआयआर’ (Special Investigation of Rolls – SIR) मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन मतदारांना एक महत्त्वाचा फॉर्म देत आहेत. हा फॉर्म तुम्ही ऑनलाई . फॉर्म भरण्यापूर्वी करायची सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी ॲप डाऊनलोड करा: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले-स्टोअर (Play Store) वर…

Read More

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी बंडखोरी करत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता लोकसभा सचिवालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी हा निर्णय देण्यात आला. बंडू जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे…

Read More

पुणे–बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबार:कालगावच्या सरपंचाकडून व्यावसायिकावर हल्ला, पैशांच्या वादातून गोळ्या झाडल्याचा आरोप

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळील इंदोली फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबारामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. व्यावसायिक व्यवहारातील पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी संतोष घोलप यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात घोलप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक…

Read More