भारनियमनामुळे विद्यार्थ्यांचा रात्री वीज कार्यालयात अभ्यास:रात्रीचे भारनियमन त्यात बिबट्याची दहशत; दिंडाेरीचे नागरिक व विद्यार्थी त्रस्त
दिंडोरी परिसरातील वाढत्या वीज भारनियमनामुळे हैराण झालेल्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या कार्यालयात जात रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत अनोखे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी कार्यालयातच अभ्यास केला. अखेर, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून भारनियमन रद्द करण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. निळवंडी रस्त्यावरील जाधव वस्ती, पिंगळे वस्ती, बोरस्ते वस्ती…