बैलगाडीने रस्ते खराब झाल्याच्या हास्यास्पद उत्तराने ग्रामस्थांचा संताप:हिरपूर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला मागितला विकासकामांचा हिशोब
हिरपूर येथे सोमवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा वादळी ठरली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंवदा मोरे होत्या. ग्रामसभेच्या सुरुवातीला ‘सेल्फ सर्व्हे’अंतर्गत घरकुल लाभार्थींच्या यादीचे वाचन करण्य . ग्रामस्थांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेषतः मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचा खर्च, शासनाकडून प्राप्त निधी, त्याचा विनियोग याबाबत…